
याच्याशिवाय अजून वेगळे काय असते ..
सांग ना ग प्रिये प्रेम काय असते ?
रोज रोज तुझी आठवण येते ..
रोजच तुला भेटावेसे वाटते ..
जेंव्हा जेंव्हा आपली गाठ भेट होते ..
बोलताना तुझ्याशी भान हरवून जाते ..
हातात देतेस हात जेव्हा तू प्रेमाने ..
विसरून जातो जग सारे मी आनंदाने ..
अश्रू आले डोळ्यात तुझ्या तेंव्हा मन माझ रडत .. तुला हसवण्यासाठी काय काय करत ..
कितीही रागावलीस माझ्यावर तरी प्रेम तुझ्यावर करते .. फक्त तुझ्या आठवणी मन माझे झुरते ..
याच्याशिवाय अजून वेगळे काय असते .. सांग ना ग प्रिये प्रेम काय असते ?