ती दोघं...

ती दोघं...

त्यांच बिनसलच होत गेले काही दिवस  तो काहीही बोलला तरी ती त्याचा वेगळा अर्थ काढायची..
तो बोलला तरी भांडण, गप्प राहिला तरी भांडण
ते भांडण मिटवायच म्हणून तो तिला सिनेमाला घेऊन गेला पण ती गप्पच होती,शांत होती, काहीच बोलायला तयार नव्हती. तिचा चेहराच सांगत होता कि , तिचा निर्णय झालेला होता..
ते घरी परतत होते. तो गाडी चालवत होता.
शेवटी न राहवून ती त्याला म्हणालीच.. "मला वाटत..हे अस रेटण्यात आणि एकमेकांना छळण्यात काहीच अर्थ नाही..मला वाटत आपण आपापल्यां वेगळ्या वाटांनी जाव..मी तरी तसा निर्णय घेतलाय..यापुढे आपण न भेटनच योग्य...!
ते ऐकून त्याला धक्काच बसला..
त्यान गाडी स्लो करत रस्त्याच्या एका बाजूला नेऊन थांबवली त्याचे डोळे पाण्याने डबडबले ,
त्यान खिशात चाचपून पाहिलं.एक कागदाच चीटोर तिच्या हातात देत डोळे पुसले..
आणि ती चिट्ठी उघडून वाचणार तेवढ्यात समोरून एक भरधाव गाडी आली.. थेट यांच्या गाडीवरच येऊन आदळली..
त्या अपघातात 'तो' जागीच ठार झाला..आणि तिला मात्र किरकोळ जखम झाली... हातात ते चीटोर तसंच होत..
ते एकदम उघडून तीन पाहिलं तर
त्यावर फक्त एकच वाक्य
लिहिलेलं होत ..


'तुझ्याशिवाय जगण शक्य नाही, तू सोडून गेलीस तर त्याक्षणी मी मरेन...!
...तो खरच त्याक्षणी मेला होता..
प्रेम असंही असत...जे मागू ते देऊन
मोकळ होत..
मागायचं काय, मरण कि जगण... हे प्रेम करणाऱ्यांनाच ठरवावं
लागत....!
Share on Google Plus

About Hanumant Nalwade