Join us on Facebook

Please wait..20 Seconds

तुझ्या चेह-यावरचे समाधान.

Photo: तू माझ्या पासून दूर गेलीस तरी तुझी आठवण मी नेहमी करत राहील ..

काय माहीत जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली परत भेट होईल ..

भेटशील कधी मला तर तुझ्याशी दोन शब्द बोलायला मी तयार राहील ..

विसरू नका मला कधीच तु माझी नसलीस तरी मी तुझाच राहील ..कळत नकळत कधी जुळतात नाती न सोडवता सुटते गुंतागुंत भावनांची
ॠणानुबंध म्हणावा की रेशीमगाठी कोणी नाही कोणाचे पण
तरीही जगतो एकमेकांसाठी मी जाणार कुठे तुला सोडुन
मग जगायला ह्या देहात प्राण आणणार तरी कुठुन
जायचं असतं तर केंव्हाच गेलो असतो पण खुप जास्त प्रेम आहे मनात जे येतं दाटुन
स्पर्श तुझा जाणवतो तु जवळ नसताना भास अन आभास तुझा तुझी पाऊले वाजताना

मिठीत तुझ्या विरघळतो मग मिही सारं काही विरघळतो ....
सारं काही विसरुन जातो... तु कधीच मला सोडुन जाऊ नकोस
हीच इच्छा मनात बाळगतो क्षणोक्षणी जाणवतायतं आज
तुझ्या असण्याचे भासं अन तरीही मनात असते तुझा मिलनाची आस
पण कितीही वाट पाहीली तरी तुझी पाऊले मात्र वाजत नाहीत
मनातल्या माझ्या मिलनगीताला चाल कधीच  मिळत नाही
तुझ्या श्वासांत श्वास माझा एकरुप असा होऊन जातो
तुझा स्पर्श मला सुखावत असतो तुझ्या सहवासात मी विरघळुन जातो
अन तुझ्या चेह-यावरचे समाधान डोळ्यांत भरुन घेत असतो.
तुझ्या चेह-यावरचे समाधान. तुझ्या चेह-यावरचे समाधान. Reviewed by Hanumant Nalwade on June 25, 2013 Rating: 5
Powered by Blogger.