अस कोणी असाव जीला भेटल्यावर दु:ख सार
विसराव
अस कोणी असाव जीला पाहिल्यावर हास्य सूंदर
उमलाव
अस कोणी असाव जीच्या सहवासात
जग सार विसराव
अस कोणी असाव जीच्या स्पर्शाने अंग सारे
प्रेमलहरींने उधळाव
अस कोणी असाव जीच्या डोळ्याने मनातल सार
कळाव
अस कोणी असाव जीच्या मिठ्ठीत विश्व सार
मिळाव
अस कोणी असाव निघते म्हणुन आणखी थोडावेळ

बसाव
अस कोणी असाव ज्याच्या आठवणीत
हसता हसता रडाव अण रडता रडता हसाव
अस कोणी असाव जिला गर्दीतही अचुक
ओळखाव
अस कोणी असाव जिच्या सोबत हक्काणे भांडाव
अस कोणी असाव जिच्याजवल मनातल सार
बोलाव अण मन अस हलक व्हाव
"शेवटी अस कोणी नसाव ज्याच्यावर प्रेम
असुनहि अता तु मला विसर अस म्हणाव "

गूगल ऐडवर्ड्स

 
Top