काल गझल पहिली लिहीत होतो..
तिच्या डोळ्यातलं शब्दांत घेत होतो..

नीटस साधीशी ठेवण राखत होतो..
जशी ती तशी गझल उतरवत होतो..

गजरा मोगऱ्याचा मोगराच झालो होतो..
निखळलेल्या कळ्यांसवे केसांत अडकलो होतो..

सुगंध उशीला तिचा गंधाळलोच होतो..

अत्तराच्या कुपीतला कापूस भासलो होतो..

पैंजणांची छुमछुम चंद्रकोरीवर भाळलो होतो..
हनुवटीच्या तीळाशी खिळून राहिलो होतो..

कित्येक रचना भिरकावल्या हवेत तिच्यापुढे
कदाचित शब्दांकित तिच्यामुळे झालो होतो..

वेडा कसला रदीफ कसला शेर
विझवून चांदण्या चंद्र झालो होतो..

काल गझल पहिली लिहीत होतो..
तिच्याच डोळ्यातलं शब्दांत घेत होतो..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top