ज्यात हरवून जावे असे कुणी असाव..
नावामुळे ज्या आपल नाव विसराव..

इतके हि कुणी आपल व्हाव..
न्हाहून जाव आभाळ मनाच इतक लक्ख त्याच रूप असाव..

गर्दीतही शोधतील नजरा ज्यास..
असे कुणी गर्दीतून वेगळे वाटणार भेटाव..

हिंदोळ्यावर प्रेमाच्या दूरवर फिरत रहाव..
कुणी इतक मधुमय इतक कोमल साजेस मला भेटाव..

सजलेल्या चांदण्यांना चंद्रापेक्षा हि तेच आवडाव..
अन त्यांच्या ऐवजी ते आधीच माझे झालेलं असाव..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top