सुख आणि दु:खजर सुखातच नांदत गेलो ,तर दु:ख काय ते काळले नसते .
जर दु:खाचा डोंगर कोसळला नसता ,
तर सुखाची किंमत नसती .
...
दु:खाच्या मागे सुख दाडलेले आहे ते विसरायचे नसते ,
सुख-दु:खाची सावली जीवनात येत जात असते
सुखाचे दिवस आले की ,हवेत उडायचे नसते .
दु:खाने पाठलाग केला की ,हिंमत हरायची नसते .
सुखात जसे आनंदाने जगतो ,
तसे दु:खाच्या प्रसंगात पण हिंमातीने जगायचे असते .
या जगात खूपच माणसे दु:खी आहेत .
त्यांचा पण विचार करायाचा असतो
दु:ख कुणाच्या कायमस्वरूपी राहत नाही ,
हे मनात समजून घायचे असते .
सुखाचा दिवस आला की दु:खी माणसांना विसरायचे नसते ,
चला जगू या आनंदाने परमेश्वराची आपल्यावर कृपा वाहतच असते .
ज्यांनी आपल्याला हे जग दाखविले ,
त्यांचे उपकार विसरायचे नसतात .
दु:ख देणारा आणि सुख देणारा पण तोच असतो
दु:ख त्यांनी दिले नसते ,
तर त्यांनाच आपण हमखास विसरलो आसतो.
सुख आणि दु:ख सुख आणि दु:ख Reviewed by Hanumant Nalwade on January 30, 2013 Rating: 5
Powered by Blogger.