प्रेम करणारी असावी


अशी असावी माझी प्रेयसी........

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच,
माझ्यावर प्रेम करणारी असावी

खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी

शेर -ए-गझल नसली तरी,


माझी एक छानशी चारोळी असावी

बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी

हाय... हेलो...
नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी

पण मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी असावी......

मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी..
प्रेम करणारी असावी प्रेम करणारी असावी Reviewed by Hanumant Nalwade on December 23, 2012 Rating: 5
Powered by Blogger.