गालातल्या गालामध्ये हसलीस अशी

गालातल्या गालामध्ये हसलीस अशी,

मनामध्ये नकळत बसलीस कशी..???

पाहून बघ तुला कसा चाफा हि फुलला,

गुलाब हि बघ कसा देढावर डूलला..♥

टपोरे डोळे तुझे बघ कसे इशारा करतात,

तुझ्यासोबत क्षण कसे पटकन सरतात,

गाव वाटे मला तुझी विन रिता,

रातीचा चंद्र हि तुज्या विन फिका...♥

हृदयाच्या कोनात घर करून रहा,

जाताना मागे डोकावून पहा,
हसणं तुझं नेहमी असंच हसत रहावं,

सुखाने नेहमी तुझ्या पायाशी रहावं..♥

साथ देऊन माझी,अर्थ दे आयुष्याला,

काही नको अजून,या तुझ्या वेड्याला...♥
Previous Post Next Post