अधुरे प्रेम...

आपणच तोडायला हवेत
आता सारे बंध..
दूर सारायला हवा
हळव्या स्मृतींचा गंध..
अलगद सोडवून टाकू
प्रेमाचे हे रेशीमधागे..
वळून पहायलाही काही
ठेवायचं नाही मागे..
आपणच रेखाटलेल्या रांगोळीचे
रंग आपणच पुसायचे..
पापण्यांत अश्रू दडवून
जगासमोर हसायचे..
आपणच विणलेल्या स्वप्नांना
आपणच देऊ मूठ्माती..
या जन्मीचं राहिलेलं प्रेम
राखून ठेवू पुढच्या जन्मासाठी..
Previous Post Next Post