
जुन्या दिवसात वाटायचं काही ठेवलं नाही.
आज का सगळं गोळा होऊन आलंय.
मन त्या दिवसात त्यातलंच होऊन गेलंय.
तेव्हा ते वाटायचे कसले हे दिवस
आत्ता ते जाणवतंय गेले ते दिवस
होते जे हात गळ्यात गावभर
ओळखतील ना ते हात, अडखळणार तर नाहीत
ज्यांच्याशी भांडलेलो, त्यांना जाऊन भेटायचंय
ओळखलत का सर मला, हसत हसत विचारायचंय
सापडतील ना ते आज अजूनही तिथे
मनातली घरं काही जागा सोडत नाहीत
एवढ्याश्या गोष्टी तोंड भरून सांगायचे
मंदिरात, चावडीवर माणसं जशी भेटायची
आज जर गेलो तर असतील का ते तिथेच मनातली माणसं काही कट्टा सोडत नाहीत रंगलेली नाती, फुललेल्या कथा डोळ्यातल्या डोळ्यात फिरायची कळतील ला आज तेव्हाची निर्मळ नाती मनातले रंग काही फिके पडत नाहीत...