तुझ्या नकळत मी तुझ्यावर प्रेम केलं
तुझ्या बरोबर आयुष्यभर राहण्याचं स्वप्न पाहीलं
तुझ्यामुळेच प्रेमाचा खरा अर्थ मला कळला
पण या प्रेमाची जाणीव कशी करुन देऊ तुला

जिथे जिथे पाहतोय तु आणि फ़क्त तुच दिसतेस
नजरेस नजर देता खट्याळ हसतेस
तुझं बरोबर असणं जणू स्वप्न वाटे मला
मला सगळीकडे तुच दिसतेस
पण मग मीच कसा गं दिसत नाही तुला

तु अजाण आहेस माझ्या या प्रेमाने
सांगितल नेहमी मुक्या ईशा-याने
पण तो ईशारा तुला कधीच कसां ना कळला
कधी मी सगळ शब्दात सांगु शकेन का तुला?


एकदा निश्चयच केला होता तुला विसरण्याचा
हजारदा केला प्रयत्न सगळं संपवण्याचा
पण प्रत्येक प्रयत्न माझा, माझ्याच प्रेमापुढे फ़ोल ठरला
जणु हे वेडं मन कधी विसरुच शकत नाही तुला

आता तर फ़क्त एकच स्वप्न आहे या मनाचं
तुज्यासोबत शेवटपर्यंत जगण्याचं
एक दिवस नक्कीच जिंकेल
हा वेडा जीव आज जो या खेळात हरला
एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला

गूगल ऐडवर्ड्स

 
Top