M.C.A झाल्यावर

M.C.A झाल्यावर सगळ्या मित्रांची ताटातूट होणार
कितीही लांब असलो तरी रोज phone मात्र असणार
पण हळूहळू तो phone call ही कमी होत जाणार
आधी रोज, मग आठवड्यातून एकदा आणि नंतर
फक्त birthdayच्याच दिवशी केला जाणारphone केला की “कसा आहेस, काय करतोयेस?” विचारणा होणार
हुशार मुलांना job कसा चाललाय...आणि
आमच्यासारख्यांना job मिळाला का अशी चौकशी होणार
आणि पुण्यात असलो तर दर weekendला भेटायचे plan ठरणार

M.C.A. झाल्यावर...ह्या चालत्या-बोलत्या देहाचे machine होवून जाणार
पण त्या machineच्या hard disk मधेही M.C.A.च्या आठवणी असणार
कधी उघडलाच तो आठवणींचा folder की मित्रांना phone करावासा वाटणार
पण company bill भरते म्हणून सगळ्यांनी number बदलले असणार

टपरी वर एकटे चहा पिताना मित्रांची खूप आठवण येणार
मित्रांच्या बरोबर चहा पीतपीत केलेला दंगा आठवणार
(समजून घ्या चहा च्या ऐवजी काय म्हणायचे आहे ते)
मग कपातल वादळ पोटात आणि मनातलं डोळ्यातून बाहेर येणार
पण तेवढ्यात bossचा phone येणार आणि
पुन्हा त्या पाणावलेल्या देहाचे machine होवून जाणार

M.C.A. झाल्यावर सगळ्यांचे खिसे फुगत जाणार
खिश्यांबरोबर पोटही थोडसं सुटत जाणार
companyमध्ये आठ तास bossला सांभाळणारा मग
लग्नानंतर घरच्या bossला सांभाळण्यात रमून जाणार

कधीकधी मात्र एकटे असल्यावर सर्वकाही आठवणार
DPतला चहा असो किंवा SONU टपरी असो
महाराजाचं terrace असो किंवा निल्याची उधारी असो
अगदी कालच AKOLE होतो इतकं सगळं ताजं असणार

मित्रहो हे दिवस पुन्हा नाहीत येणार
पुन्हा उरतील त्या फक्त आठवणी असणार
सोबत रडलेले क्षण आठवले की हसायला येणार
पण सोबत हसलेले क्षण आठवले की डोळ्यात टचकन पाणी येणार ..
M.C.A झाल्यावर M.C.A झाल्यावर Reviewed by Hanumant Nalwade on December 16, 2013 Rating: 5
Powered by Blogger.