तो तिला खूप दिवसांनी भेटला ना की ती पहिले तर इतकं रुसायची...
एक शब्द सुद्धा बोलू नकोस माझ्याशी असं सरळ म्हणायची...
बोलून तर जायची तसं... बोलून तर जायची तसं...
पण मग तो खरंच बोलला नाही तर !!! या विचाराने कावरी-बावरी व्हायची...
अरे वेड्या बोल ना काहीतरी असं त्याला आपल्या नजरेतूनच सांगत राहायची...