पाऊस हा मला आठवतो..
भिजता भिजता तुझी आठवण सतावतो…
ती आठवण…पाहिले तुला भिजताना..
आज भिजताना का हा पाऊस मला सतावतो…
असाच एक पाऊस आठवतो….
भिजवले होतेस मला तू तुझ्यासाठीच…
वाट पाहीली होती तुझी पावसात….
भिजलो होतो शेवटचा फक्त तुझ्यासाठीच…
का भिजल्या त्या आठवणी पावसात..
अन त्या त्या पावसातच वाहून गेल्या
शिल्लक राहीली ती भिजलेली आठवण..
जणू माझे अश्रूच त्या पावसात आटून गेले
झाल्या होत्या आपल्या वाटा अलग
अशाच पावसात तू मला एकटी सोडून गेलीस
आठवते मला तू या पावसात भिजताना…
का त्या आठवणींत पुन्हा तिथेच मला सोडून गेलीस …..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top