का असावी कोणासाठी अपेक्षा
का असावी आशा निराशा
जगत राहावे जगण्याचे मार्ग
असेच जगावे आयुष्य अनपेक्षित
जगलो अनेक उमेदी आशा-अपेक्षा
का भंगल्या त्या सर्व आकांक्षा..
उरली होती फक्त निराशा…
का असावी कसलीच आशा
असावे सर्वच अनपेक्षित..
उभा आहे आज मी असा
जगतो आहे जीवन निरपेक्ष
जे हाती येती तेच जीवन
उरले सर्व काही अनपेक्षित
नसाव्यात कसल्याच अपेक्षा
नसावी कुणालाच कसलीच अपेक्षा..
ना असावी कसलीच खंत
सुख शोधावे नव्याने पुन्हा एकदा
पहा एकदा जगून आयुष्य अनपेक्षित

गूगल ऐडवर्ड्स

 
Top