तीच माझी प्रिया..गुलाबी ड्रेसमध्ये उभी, तीच माझी प्रिया..
ठेवणीतली उंची, काळेभोर केस, टपोरे डोळे, तीच माझी प्रिया..
नाक मात्र बसकं,हातात मोबाइल, नजर वाट पाहणारी, तीच माझी प्रिया..
खळी गालावर, राग नाकावर, केविलवाणी, तीच माझी प्रिया..
मी दिसताच छान हसली, मग मुद्दमच रुसली, नवीन पैंजण पाहताच मला बिलगली, तीच माझी प्रिया..
बाइकवर long drive , मग मनभरुन गप्पा, मला सोडुन नाही ना जाणार..?(टिपिकल वाक्य) तीच माझी प्रिया..
मी नाही म्हणणे, निर्मळ हास्य तिचे, आणि तिने पुन्हा बिलगणे, तीच माझी प्रिया..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top