शब्द….!!!!
मन उदास असलं की…. काय करावे तेच सुचत नाही…
कसे आणि काय शब्द मांडायचे तेच सुचत नाही..
मन एकटं पडलेलं असतं ……काळ्या ढगांनी आभाळात गर्दी केल्यासारखी ….मनात साचलेलं दु:ख….
कधी अश्रूंच्या रुपात कोसळेल काही नेम नाही…..!!!
अश्या वेळी कुठून मनात येतं कुणास ठाऊक….
हातात पेन आणि कागद घेऊशी वाटतात……..
सगळे परके …अन फक्त शब्दच जवळ वाटतात…
काय अन कसं लिहावं ..काहीच कळत नाही……
मनातही काही शब्द नसतात.


…..अश्यातच आपोआप पेन उचलला जातो… कुठेतरी कागदही सापडला जातोच सोबतीला….
उगाच काहीतरी लिहियाचे म्हणून इकडचे तिकडचे शब्द खरडायला सुरवात करायची…
का कुणास ठाऊक….हे खरडणच मनाला उमेद देते…
जगण्याची… सारं काही शब्दात मांडलं जात…
मनाची सारी जळमटं निघून जातात..कुठच्या कुठे…
कसलं सामर्थ्य असावं ह्या शब्दात….?? की आपल्याच भावनाचे खेळ..?
काही असो…
पण हेच शब्द जवळचे वाटतात…. मन हलकं करणारे शब्द…!!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top