मला प्रेम करता येत नाही.

जिवापाड प्रेम करतो मी तिच्यावर,
म्ह्णून मला तिच्याशी तासनतास गप्पा वैगरे मारता येत नाही,
आणी ह्या गप्पा मारण्याला जर तुम्ही प्रेम म्ह्णत असाल,
तर मग खरच मला प्रेम करता येत नाही......

खुप सुन्दर आहेत तिचे डोळे..
चिंब होत माझ ह्रहय जेव्हा ती बघते माझ्याकडे,
म्ह्णुन मला त्याचा नशा वैगरे होत नाही,
आणी त्या नशा होण्याला जर तुम्हि प्रेम म्ह्णत असाल,
तर मग खरच मला प्रेम करता येत नाही......

रेशमाला लाझ वाटेल असे केस आहेत तीचे,
एक गुन्था शोधत असतो मी त्यात तास् नतास,
पण मी त्यात धुन्ध वैगरे होत अस मला वाटत नाही,
आणी ह्या धुन्ध जर तुम्हि प्रेम म्ह्णत असाल,
तर मग खरच मला प्रेम करता येत नाही......

 हे सर्व मी तिलाहि सान्गतो,
तिला माझा रागही येतो,
पण मला हे लपवता ही येत नाही,
आणी ह्या लपविण्याला जर तुम्हि प्रेम म्ह्णत असाल,
तर मग खरच मला प्रेम करता येत नाही....
Share on Google Plus

About Hanumant Nalwade