Tuesday, July 31, 2012

याक्षणी आठवतेस तू.

न चुकता करावा तुला फोन  मग, उगाच तु चेष्टा करून बोलावं
बोलता-बोलता असाच वेळ निघून जावा...  याक्षणी आठवतेस तू...

फोन हाती घेतल्यावर बघावा तु पाठवलेला जुनाच एखादा "मेसेज"
बघून मग असाच विचार करत बसावा... याक्षणी आठवतेस तू...

एखाद्या दिवशी पहावी वाट करशील तू फोन म्हणून, तुझं मात्र
वेळ नाही बोलू आपण नतंर... याक्षणी आठवतेस तू...

तुझं नेहमीच खट्याळ बोलणं माझं मात्र नेहमीच तुला रागवणं
पण तरीही तुझं शात बसणं... याक्षणी आठवतेस तू...

तुझा नेहमीच माझ्याकडे हट्ट माझं मात्र नेहमीच रूबाब दाखवणं
तरीही तुझा मझ्यावर विश्वास असणं... याक्षणी आठवतेस तू...

मित्र म्हणून काय नाही केलस तू माझं मत्र "मी असाच आहे"
पण तरीही सागण्याचा तूझा प्रयत्न असणं... याक्षणी आठवतेस तू...

नेहमीच तूझं प्रेमानं बोलणं माझं मात्र नेहमीच टोचून बोलणं
तरीही तू एकून घेण्याचं मोठेपण असणं... याक्षणी आठवतेस तू...

डोळ्यातील अश्रूही थाबेना आज रूसलेत तेही मझ्यावर
मिही अश्रुची चादर पाघंरणार मनावर... याक्षणी आठवतेस तू...

Reactions: