अशी काही हसतेस तू
जणू काही आनंदाची चौफेर उधळणच  करतेस तू ....
जणू श्रुष्टीला नवचैतन्यच  बहाल करतेस तू.......

अशी काही लाजतेस तू....
जणू वसंताचे आगमनच  करतेस तू...
जणू काही हृदयच घायाळ करतेस तू....

अशी काही बोलतेस तू...
सरळ मनालाच  जावून भिडतेस तू .....
हृदयावरच राज्य करतेस तू....

अशी काही गातेस तू...
जणू काही माधुर्यचं  पसरतेस तू ...
ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करतेस तू...

अशी काही आहेस तू...
जणू काही स्वर्गातील परीच तू..
खरंच गं तुझ्यासारखी तूच तू , तूच तू....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top