एकदा तरी.

एकदा तरी आकाशात घार बनून उडायचं आहे
वरून सर्व श्रुष्टी कशी दिसते ते पाहायचं आहे
साऱ्या आकाशावर राज्य करायचं आहे

एकदा तरी पाण्यात मासा बनून पोहायच आहे
पाण्यातील जग काय आहे हे अनुभवायचं आहे
साऱ्या समुद्राशी एकरूप व्हायचं आहे

एकदा तरी फुलपाखरू बनायचं आहे
फुलातील मध चाखायचा आहे
संपूर्ण बागेत भ्रमण करायचं आहे

एकदा तरी वारा होवून पाहायचं आहे
दर्याखोर्यातून बेभान होवून वाहायच आहे
मनाला वाटेल तिकडे जायचं आहे

एकदा तरी जवान होवून सीमेवर जायचं आहे
धैर्याने शत्रूचा मुकाबला करायचा आहे
आणि देशासाठी लढताना अमर ह्यायच आहे.

काही झाल कितीही झाल तरी मात्र शेवटी
मला मी बनूनच राहायचं आहे
आणि मी बनूनच मारायचं आहे.
Previous Post Next Post