तू दूर सखे जरी... तुला मनात भेटतो.

तू दूर सखे जरी... तुला मनात भेटतो...
वारा पावसाला जसा... घट्ट कवेत खेचतो...

वारा खेचतो कवेत... त्याला भेटतो जावून ...
माझ्या मनातले सारे... त्याला सांगतो पाहून...

तोही सुसाट सुटेल...तुला येऊन भेटेल...
सखे वार्‍याच्या मनात... तुझे वादळ उठेल...

तुझे वादळ उठले.... मन सैरवैर झाले...
तुझ्या रूपात बेभान.... मन स्वत:ला भुलले...

तुझ्या मनामध्ये सखे... माझ्या मनाला भुलुदे...
सारी प्रेमाची तहान... तुला पाहून मिटू दे...

तुझी भेट जेव्हा झाली... सारी तहान मिटली
लाट किनारा गाठून... आज उनाड जाहली...

लाट उनाड उनाड... तुझ्या प्रेमात भिजली...
उंच गिरकी घेऊन... थेट नभाला भिडली...

असे शब्द ओलेचिंब... तुझ्या प्रेमात नाहले...
माझे माझे म्हणताना... तुझे प्रतिबिंब झाले...

माझे माझे म्हणताना... तुझे प्रतिबिंब झाले...
Previous Post Next Post