Saturday, July 14, 2012

नजरेत स्वतःला हरवून बघ.

आयुष्यात नुसता गगनभरारी घ्यायचा विचार केला
आणि... आणि तुझा हात हाती आला...
एकमेकांची सुख दुःख वाटून घेताना
प्रेमाने उर भरत गेला...

तुझं माझं पाउल सुद्धा मागे पुढे पडतच नाही...
आपण सोबत असताना बाकी काही उरतच नाही...

आता उरलयं प्रेम निरंतर...
तू आणि मी अस काही राहील नाही बघ...

विश्वास बसेल तुझा क्षणातच...
एकदा तुला माझ्या नजरेत बघ...

माझ्या नजरेत स्वतःला हरवून बघ...
Reactions: