स्पर्श तुझा मखमाली... लावी वेड या जीवा...
वेड्या फुला जरा तू बिलगून रहा मला...
तुझे हसणे असे मोहक... भूल घालते मना...
एकदा पुन्हा तू हस ना... जीव झाला हा खुळा...
तू धरला हात हाती... मी विसरले सारे काही...
दे आसरा कुशीचा... विसरूदे मज मलाही...
तुझा संग, तुझा स्पर्श... जगण्याला देई अर्थ...
वाटे न सरावा काळ... तुझवीन सारे व्यर्थ...
विचारले नाव कोणी... मी नाव तुझे घेते...
वेड्यात काढते कोणी... स्तब्ध कुणी होते...
असे एकरूप होणे... जिंकले तू मनाला...
उरले मी न माझी...कसे सांगू या जगाला...
उरले मी न माझी...कसे सांगू या जगाला...