पंख असूनसुद्धा उडायचं नाही मला...
मिळेल जे काही ते फस्त करून शांत पडायचय मला...
उडून तरी काय गाठणार... आणि गाठून तरी काय साधणार??
बर काही साधलं... त्याचा आनंद काय आयुष्यभर पूरणार??
ना क्षितीजापार जायचं ना आभाळ जिंकायचं मला...
इतरांसारख पंख असले म्हणून काय झाल? उडायचंच नाही मला...
ज्यांना पंख आहेत त्यांना रोज पाहतो मी...
कोणी भरारी घेतोय उंच...घर नवं बांधतोय कोणी ...
कोणी भरवतोय घास पिल्लांना... शिकवतोय उडायला कोणी ...
कोणी कंटाळला आहे जगण्याला... तर मोजतोय शेवटचे क्षण कोणी...
आयुष्य मात्र थोड्याफार फरकाने सारखचं प्रत्येकाच
असं सरळसोप जगून आयुष्य... मिळेल समाधान तरी का मला??
म्हणून पंख असूनसुद्धा इतरांसारख उडायचंच नाहीये मला...
पाहतांना सार काही गेली नजर एका पक्ष्याकडे...
शिकवत होता तो सर्वांना उंच भरारी घ्यायला...
रहावलं नाही मला म्हणून मी त्याला विचारलं...
हे सर्व करून काही फायदा आहे का तुला ???
तो हसून लागला बोलू... समाधान मिळतयं तेच मला पुरे ...
सोडून गेलो मी हे जग तरी प्रत्येकात थोडा तरी उरेन...
करेल एखादा माझे अनुकरण, हे काय आहे कमी??
दुसर्यासाठी जगण्यात एक मजा आहे वेगळीच....
बूडलो, हरलो, जिंकलो सार काही कवडीमोल वाटत त्यासमोर..
चला निघतो आता...अजुन बरीच गाठायची आहेत शिखरं मला...
भूर्रकन उडणार्या त्याला मी फक्त पाहत राहिलो...
जाता जाता नकळत भरारी घेण्याचे धाडस
अन् जगण्याची जिद्द नव्याने देऊन गेला मला...
झटकुनी बंध पसरूनी पंख आता नभांगणी जायचे आहे मला...
फडफडून पंख उंच उंच भरारी घ्यायची आहे मला...