कुठे कमी पडतोय... काहीच समजत नाही मला
माझ्या मनातले भाव... तुजेच उमगत नाही तुला
तू बसतेस रुसून जेव्हा... विचार मला छळतात
डोळे झाकले तरी अंतरात... आसवांची तळी भरतात...
कधी काही दुखलं खुपलं... मनापासून मला आठवत जा...
तुझे सारें प्रश्न नि वेदना... दूरदेशी पाठवत जा...
प्रेमात आहे ताकद आपल्या... तू फक्त आवाज दे...
येईन मी ही धावत धावत...तू हात हातात दे...
तुझेच सारे आहे वेडू... सांगू कसे मी तुला...
तुझ्यात मी अन माझ्यात तू... जाणून घे तू फुला...
विसरून जा हे जगणे, मरणे... माझीच फक्त होऊन जा...
प्रवाह सारें लांघून ये तू... अथांग सागर होऊन जा...
तुझ्या मनाचा ठाव घेणारे... असे माझ्या मनात गाव आहे ...
देतो काढून काळीज हाती... फक्त तुझेच सखे नाव आहे ...