तुझं माझ्या आयुष्यात येणं माझ्यासाठी निराळंच ठरलं
अगदी एखाद्या फ़ुलासारखं मोहक, नाजुक,अलगद, हळुवार
तसंच काहीसं सुंदर.....

कळी उमलताना वाटलचं नाही की त्याला एवढा बहर येईल,
कदाचित म्हणूनच त्याचं असणं आल्हाददायक वाटावं
तुझं प्रेमही तसंच अमॄतासारखं मधुर
नवजीवन देणारं

माझंही काहीसं तसंच झालंय आज जगण्याला अर्थ आलाय
अगदी हवहवसं काहीतरी .....अन तेही , फ़क्त तुझ्यामुळे
फ़क्त तुझ्यामुळेच .

गूगल ऐडवर्ड्स

 
Top