जगणेच जमत नाही.

कितीही वेळा सांगितलं, तरी तिला पटत नाही.
माझी तिच्यावरची प्रीत,  तिला कळत नाही.

जाणून बुजून करते आहे ती हा वेडेपणा,
का खरच तिला माझ्या भावनांची कदर नाही.

कधी कधी वाटत, शेवट करावा सगळ्याचा,
मात्र तिच्यावाचून श्वास, घेणंही जमत नाही.

कदाचित तीच घेत, असेल माझी परीक्षा,
कारण या  जगात शुद्ध प्रेम, सहजासहजी मिळत नाही.

तिच्यसाठी क्शितीजापर्यान्तही. करेन मी प्रतीक्षा .
काय करू आता तिच्याशिवाय, जगणेच जमत नाही.
Share on Google Plus

About Hanumant Nalwade