आपल आपणच राहायचं आपल आपणच हसायचं
आपल आपणच रडायचं आपल गुपित मनात ठेवायचं
कुणाला काहीच नाही सांगायचं

कधी कधी वाटत सर्वांपासून दूर खूप  जायचं
एकट एकांत वावरायचं समाजापासून दूर बसायचं
आपणच आपल्या तंद्रीत जगायचं...

कधी कधी वाटत इतरांपेक्षा काहीतरी वेगळ करायचं
मनाला वाटेल तेच व्हायचं आई-बापच नाव मोठ्ठ करायचं
दुनियेला कोण आहे हे दाखवून द्यायचं....

कधी कधी वाटत सर्व काही विसरायचं
सर्व काही माग ठेवायचं  स्वतःचा शेवट करायचं
आणि हसत हसत निघून जायचं...

तर कधी कधी वाटत झाल गेल विसरून जायचं
पुन्हा नव्या जोमान उभारायचं ध्येयासाठी आहोरात्र झगडायचं
यशस्वी होवून पाहायचं आणि सुखानं,समाधानान   जगायचं...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top