Thursday, July 5, 2012

माफीनामा.

अगं  बोल माझ्याशी  राणी नाही तर डोळ्यात येईल पाणी...
खरंच चुकलो आहे मी... विरुद्ध वागलो आहे मी....माफी मागतो आहे मी....

पुन्हा अशी चूक होणार नाही पुन्हा तुला  त्रास देणार नाही
पुन्हा असं काही बोलणार नाही तुला  वाईट वाटेल असं काही करणार नाही

माझ्याशी असे  अबोल होवू नको  मला असे परके समजू नको
माझीच चूक झाली, ठावूक आहे मला पुन्हा असे होणार नाही वचन देतो तुला

प्रत्येक क्षणी मी झुरतो आहे थोडा थोडा मरतो आहे
पुन्हा सगळे पहिल्यासारखेच होईल सदैव आपले हे अतूट  नाते टिकून राहील

मनावर हे ओझे घेवून जगू शकत नाही असा  हा अंत मी  बघू  शकत नाही
आता तरी बोल माझी राणी खरंच डोळ्यातून पडते आहे पाणी....
Reactions: