प्रेम म्हणजे काय असतं.


खरचं ........... प्रेम म्हणजे काय असतं ?
...
तिच्या डोळ्यांतील अश्रु जेव्हा .........
आपल्या डोळ्यांतुन ओघळतातं....
ते प्रेम असतं .......
तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा .....
तिच्या गालावरील खळीतुन खुलतं .....
ते प्रेम असतं .......
जेव्हा तिच्या आठवणीच ........
तुमचा श्वास बनतातं .......
ते प्रेम असतं ......
जेव्हा तिच्या येण्याची हलकीशी चाहूल .....
तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते .....
ते प्रेम असतं .....
तिच्या काजळ डोळ्यांतील काळजी .....
नकळत सांगुन जाते की ......
या जगात आपलं हक्काचं कुणीतरी आहे .....
ते प्रेम असतं ......
जेथे शब्दांची गरज नसतेच कधी ......
एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो .....
न बोलताच भावना व्यक्त होतात .....
ते प्रेम असतं ......
विरहाचा प्रत्येक क्षण जेथे ......
युगांसमान भासतो .....
ते प्रेम असतं ......
चांदण्या रात्रीतील रेश्मीस्वप्नं .....
दोघांच्या पण डोळ्यांत जन्म घेतातं .....
ते प्रेम असतं .......
प्रेम म्हणजे काय असतं. प्रेम म्हणजे काय असतं. Reviewed by Hanumant Nalwade on July 04, 2012 Rating: 5
Powered by Blogger.