Thursday, July 5, 2012

फक्त माझ्यासाठी.गोंधळलेला मी .....

आजकाल खरच काय होतंय,  ते कळतच  नाही.
दिवस आणि रात्रीतलं, फरकच कळतच नाही .

काय करतो आहे हे
समजत नाही, 
आणि काय कराव हे उमगत नाही....

नभातील चांदण, एखादी वाऱ्याची झुळूक ,
आणि रातराणीचा सुवास 
या गोष्टींकडेच जास्त लक्ष देतो मी आणि आपसूकच माझ्यातलाच मी हरवून जातो मी ....
माझ्यातला मी
सापडतच नाही मला,तहान आणि भूक लागताच नाही मला...
तरीही मन व्याकूळ होत कुणासाठी ,दिवस-रात्र जीव झुरतो जिच्यासाठी ....
डोळ्यांसमोर एकच चेहरा,आणि कानामद्धे एकच आवाज घुमतो प्रत्येकवेळी, 
आणि वेळे वरची कामेही करतो मी अवेळी ....

यालाच जर प्रेम म्हणत असतील ,तर होय खरच मी प्रेमात आहे .
जी गोड हसते आहे,थोडीशी  लाजते आहे,
फक्त माझ्यासाठी.... 
Reactions: