आठवतोय का रे तुला...
हा कट्टा हिरव्या झाडीच्या गर्दीतला...
किती दिवस दीर्घ श्वास घेतला नाही
हे या जागी येऊन जाणवते आहे...
श्वास... नक्की कुठे हरविला ?
याची अनुभूती आज येतेय बघ...
जुन्या आठवणी जुने रस्ते याचं संगनमत झालंय...
हे करोडो लोकांच्या गर्दीत तू गवसल्याने जाणवलंय...
मला एक सांग...
याच कट्ट्यावर बेभान होऊन आयुष्याची स्वप्न रंगवलेली...
व्यवहारी जगात येऊन त्यांचा ऱ्हास झाला का रे?
जाऊदे रे मित्रा...
आज पुन्हा या कट्ट्यावर आणलंय नियतीने...
बहुदा राहिलेली स्वप्ने जगण्याचा प्रयत्न करण्यासाठीच...
त्याच्या उत्तरावर स्मित हास्य करून
पुन्हा एकवार मी दीर्घ मोकळा श्वास घेतला...