Saturday, July 14, 2012

तुझ्यातला मी

विसरून जा सार...

धर हातात हात माझा ...मला घट्ट बिलगून बस...
बघ माझ्या नयनात स्वतःला...अन् गोड लाजून हस...

बेधुंद बहरले निळे आकाश, चांदण्यांचे लाखो थवे...
तू, मी आणि एकांत साथीला... सांग सखे आणि काय हवे?...

मनातली गर्दी सार दूर तू... होऊन राधा माझ्यात वस...
धर हातात हात माझा ...मला घट्ट बिलगून बस...

काळजी उद्याची नको करू... नागमोडी वळण घेत दोघे फिरू...
भीती कशा उगा पाहिलं कुणी... अनोळख्या बेटावर घर करू...

सजेल चांदरात तुला पाहूनि... तुला पाहुनि हसेल दिवस...
धर हातात हात माझा ...मला घट्ट बिलगून बस...

भरून वाहूदे स्वप्नांची ओझंळ ... मनातल्या फुलांना बहर येऊदे...
माझ्यातली तू अन् तुझ्यातला मी... असे नवे एक गाव वसू दे...

न काही उणे, नाही बंधने... प्रेमाचा पाउस होऊन बरस...
सोडू नको कधी हातातला हात... मला घट्ट बिलगून बस...

जाणून घे सखे प्रेमाचा स्पर्श... अन् गोड लाजून हस...

अन् गोड लाजून हस...

Reactions: