असेल कुणीतरी.

असेल कुणीतरी........ .............

असेल कुणीतरी, जी माझ्यासाठी देवाने बनवली असेल,

असेल कुणीतरी, जी माझी वाट बगत असेल,

असेल कुणीतरी, जी नेहमी माझाच विचार करत असेल,

असेल कुणीतरी, जी स्वप्नात सुधा मला शोधत असेल,

असेल कुणीतरी, जी चेहऱ्याने सुंदर नसली तरी मनाने सुंदर असेल,

असेल कुणीतरी, जी थोडीशी नाजूक, थोडीशी भावूक आणि थोडीशी लाझ्री असेल,

असेल कुणीतरी, जी चांद ताऱ्यान मध्ये देखील मला शोधत असेल,

असेल कुणीतरी, जी जीवाला जीव देणारी असेल,

असेल कुणीतरी, जी दिवसात सुधा स्वप्नं बगत असेल,

असेल कुणीतरी, जी आपल्यावरती रागवेल आणि त्या रागात सुधा आपल्यावरती प्रेम करणारी असेल,

असेल कुणीतरी, जी आपण कितीही रागावलो तरी प्रेमाने मनवनारी असेल,

असेल कुणीतरी, जी मनात माझा विचार करून गालातल्या गालात हसणारी असेल,

असेल कुणीतरी, जी माझ्या सुखात आणि दुखात आयुष्भर मला साथ देणारी असेल,

असेल कुणीतरी, जी फक्त माझ्यावर फक्त माझ्यावर मरे पर्यंत प्रेम करणारी असेल,

असेल का अशी कुणीतरी, जी माझ्यासारखाच विचार करणारी असेल.

Share on Google Plus

About Hanumant Nalwade