खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं
खरं प्रेम जे आता फक्त आठवणीत उरलं.

जेव्हा तुला पाहिलं, तेव्हाच मी जाणलं
प्रेम मी फक्त तुझ्या डोळ्यात पाहिलं.
जेव्हा तुला पाहिलं, तेव्हाच मी जाणलं
त्याक्षणी माझ्या मनांत तुझं प्रेम जागलं.

प्रेम हे कधी लपत नसतं, ते आपसूकच दिसतं
तू कधीच सांगितलं नाही, तुझ्या डोळ्यात ते नेहमीच दिसलं.
प्रेम हे कधी लपत नसतं, ते आपसूकच दिसतं
प्रेम कधीच कळत नाही, ते हळूच स्पर्श करतं.

प्रेम मी जीवापाड केलं, तुझ्यासाठी मी आयुष्य जगलो
तू कधीच बोलली नाहीस, पण मी ते कधीच जाणलं.
प्रेम मी जीवापाड केलं, तुझ्यासाठी मी आयुष्य जगलो
तुझ्यासाठी फक्त मी, माझं जगणं तुझ्या नावे केलं.

आता काहीच नाही राहिलं, आता फक्त आठवणीतच उरलं
तू सोडून गेलीस अन डोळ्यात पाणी तरलं.
आता काहीच नाही राहिलं, आता फक्त आठवणीतच उरलं
तुझ्या आठवणीत फक्त आता माझं आयुष्य उरलं.

खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं
खरं प्रेम जे आता फक्त आठवणीत उरलं.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top