आठवण तुझी येतच
नव्हती कारण तू येणारच
होतास, माझ्यासाठी
आठवण तुझी येतच
होती कारण तू येणार
होतास, जाण्यासाठी
का असा छळतोस
मला ? हवे असताना तू, टाळतोस मला?
भेट तुझी-माझी
होणारच आहे कारण मी 'तुझ्यासाठी' येणारच आहे
कळत कसे नाही
तुला ? तुझ्या शिवाय
अर्थ नाही मला....
स्पर्श तुझा
जाणवत राहतो कळतच नाही कि, तो भास असतो
कसली हि आतुरता? कशासाठी आसुसलेपणा?
असतोस तू जवळ, तरीही अधुरेपणा....
घटत काळोखात
मिटून जावसं वाटतं तुझ्या मिठीत
भरून राहावंस वाटतं
भुकेले ओठ, तहानलेली नजर, आता थोडी तरी
किव कर
हे सगळं तुला
कवितेतलं वाटतंय ? पण कधीपासून
असं मनात सलतंय
पापण्या
मिटल्यावर तूच असतोस उघडल्यावर, पापण्या संगे वेडी आस असते
येशील? दूर? जिथे हे सगळं संपणार असेल? असा अंत खरंच
आपल्याला मिळेल?
बोलना, काहीतरी बोल! खोल-खोल! का तुझे डोळे, नि माझ्या भावना अबोल?
भावनांना
डोळ्यांतून वाटा करून दे, तू माझा
माझ्यासाठी राहू दे....!
तू माझा
माझ्यासाठी राहू दे....!