मी वाट पाहतोय .

मी तुझी वाट पाहतोय ...

मी वाट पाहतोय ...

प्रेमाचा पसारा आणि मायेचा विसावा..
घट्ट धरलेला हात आणि अडकलेला श्वास..
मांडलेला डाव उधळून, रागावून तू निघून गेलीस..
पण भावनांचा गुंता थोडा अजूनही बाकी आहे...
सोडवायची इच्छा नाही.. कारण मी तुझी वाट पाहतोय...

तास-न-तास मारलेल्या गप्पा..
हातात हात घालून तुडवलेला एकाकी रस्ता ...
एकांतात ऐकलेली कित्येक गाणी आणि गोष्टी..
एकत्र अंगावर झेललेल्या त्या पावसाच्या सरी...
तुझ्या प्रेमात अजूनही चिंब भिजलेला उभा... मी तुझी वाट पाहतोय...

सगळ्यांच्यात असूनही वेगळे जगलेले कितीतरी क्षण...
तुझ्या लांब सडक केसात गुंतलेलं माझ  मन...
सगळ्या जगाची  नजर  चुकवून  हळूच  तुला  पाहणारी  नजर ...
रात्र -न -दिवस  माझं तुझ्यासाठी  आणि  तुझं माझ्यासाठी  धडधडणार  ऊर...
तुझ्याचसाठी  जगणाऱ्या   या  जीवाला  जगवत... मी  तुझी  वाट  पाहतोय ...

माझ्या  हातून  नकळत  घडलेली  चूक ..
नात्याला  आपल्या  तिने  भेदला  अचूक ...
तो  राग  आणि  संताप  आणि  चिडलेली  तू ...
विनवण्या  करणारा  मी .. कारण  हवी  होतीस  तू ...
दोघांच्याही  रडणाऱ्या  डोळ्यातला  ते  आटलेलं पाणी ..
मला सोडून जाणारी तुझी पाठमोरी आकृती .. परत  फिरशील  म्हणून मी  तुझी  वाट  पाहतोय ...

मारायला  सोप्पं वाटतंय  ग ... पण  मी  नाही  मारणार ...
तू  परत  आल्यावर  तुला  कुशीत  कोण  घेणार ..??
प्रत्येक  उगवत्या  दिवसागणिक  तुला  हाक  मारतो  आहे ..
रोजच  दिवेलागीण  झाली  कि  देवाकडे  पुन्हा  तुझी  साथ  मागतो  आहे ...
रोजचीच  ती  भयान  काळरात्र  उघड्या  डोळ्यांनी  जागवतो  आहे ...
परत  ये  सखे  मी  खरच  तुझी  वाट  पाहतो  आहे .....
मी वाट पाहतोय . मी वाट पाहतोय . Reviewed by Hanumant Nalwade on June 22, 2012 Rating: 5
Powered by Blogger.