अव्यक्त प्रेमाची कधीच वाटली नाही खंत
बाळगला संयम योग्यासारखा नव्हतो जरी संत
आनंद होकाराचा दुःख नकाराचं अनुभवु शकलो नाही
धैर्य नव्हतं म्हणा हवं तर पण मी चुकलो नाही
ठरवू पाहात होतो मीच माझं प्रारब्ध
झालो तिच्यावर लुब्ध पण होतो निःशब्द
मागुन तिच्या मी उगीच भटकलो नाही
धैर्य नव्हतं म्हणा हवं तर पण मी चुकलो नाही .

गूगल ऐडवर्ड्स

 
Top