एक थेंब


एक थेंब .... पानावर सजलेला.. हिरवाईच्या रंगात हिरवळलेला..
एक थेंब .. अमृतवेलावर लटकलेला, धरती चुंबनाच्या प्रतिक्षेत तहानलेला..
एक थेंब .. कमळाच्या देठावर अधारलेला, ओघलण्यासाठी मग लय कशाला हवीये त्याला..
एक थेंब ... तळ्यातल्या थेंबाबरोबर मिसळलेला, आपणच तळे झालो या आंनदाने भारावलेला..
एक थेंब .. वार्‍यात उंच झेपावलेला, गारव्याच्या शहारा मग त्याने सर्वत्र पांघरलेला..
एक थेंब ... थेंबाथेंबातुन बरसलेला, शिस्तिच्या आहारी मग सरींच्या मर्यादेत सांडलेला..
एक थेंब ... परिश्रमाच्या घामातला, जिंकण्याची उमेद बाळगलेला..
एक थेंब... कळीच्या गाभार्‍यातला, समांगाने फुलात उमलवून गेला..
एक थेंब.. ओठांच्या पाकळीतला, गुलाबी नाजूक ओठांशी संवादलेला...
अन एक थेंब अखेर...

आठवणीच्या स्पंदनातला, ओल्या पापण्या अन ओल्या कडातून मना ओलावलेला..
Previous Post Next Post