माझे मलाच कळते .

मी होते तिथेच आहे बाकि सारे बदलले
ह्रुदयातल्या स्पन्दनाचे वादळ आता शमले
मी होते तिथेच आहे काळ मात्र बदलला
सरत्या सरितला गारवा मात्र उरला
मी इथेच आहे पन तु मात्र नाहिस
माझ्या मनाला तुझिच तरि साथ आहे
दूर जरी मी तुझ्यापासुन इथे
तुझाच मझ्या हाति हात आहे
मैलांचे अंतर आपल्यात आहे
तरि मने मात्र जोडलेलि
माझ्या एकाकि जीवनाने आठवनीची चादर ओढलेलि
खरच आठवनित तुझ्या जेव्हा पापणीची पणती विझते
तुझ्या चाहुलिने संध्या रात्र रात्र जळतेपण हे माझे मलाच कळते .
Previous Post Next Post