मैत्री केली तुझ्याशी
ठेवूनि एक आशा मनाशी
पण... आपल्या मैत्रीला नव्हती
साथ आपल्या नाशिबांची

... केला खूप प्रयत्न आपली
मैत्री टिकवण्याचा
शेवटी एकटाच पडलो मी
सावरता आपल्या मैत्रीला

तुझी प्रत्येक चूक
गेलो विसरून मी
पण माझी एक चूक
तू नाही विसरलीस

तरीही ठरवले , मनाशी
विसरायचे ते कटू क्षण
करायची नवीन शुरुवात ,
आपल्या मैत्रीची
वेचून नवीन क्षण
 
 मी पुढे टाकले एक पाउल
तू ही पाउल टाकशील का?
निभावण्या आपल्या मैत्रीला
साथ माझी देशील का?

प्रश्न नाही माझा हा
प्रश्न आहे आपल्या मैत्रीचा
विचार कर जरा
आपल्या काही वर्षापूर्वीच्या मैत्रीचा

पुन्हा मागतो माफी मी ,
केलेल्या आणि न केलेल्या चुकांची
जमले तर माफ कर मला
वाट पहात आहे तुझ्या उत्तराची ..........

गूगल ऐडवर्ड्स

 
Top