आज पुन्हा ती भेटली.. अन मनाने उंच झेप घेतली.

पुन्हा तोच अल्लड वारा.. साद घालतो त्या शपथांची..
साथीस त्याच्या सुगंध फुलांचा.. करी आठवण त्या भेटींची ...
आज पुन्हा ती भेटली..
गुंजन करीत पक्षी तसेच... करीत आठवण तिला वेळेची..
परतत घरट्याकडे देतात मज वचन... सकाळच्या भेटीची..
आज पुन्हा ती भेटली..

तोच सूर्य मावळतीचा... साक्षीदार तो त्या विरहाचा..
चंद्र दिसे दूर क्षितिजावरती..... देत आश्वासन पुन्हा भेटीची..
आज पुन्हा ती भेटली..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top