मला माफ कर मी तुला नाही मिळवू शकलो !!

सच एकदा चालता चालता
खूप दूर निघून गेलो
असच एकदा विचार केला
अन सगळ विसरून गेलो

खूप प्रयत्न केले परत यायचे
पण खूप वेळ झाला होता
प्रेम म्हणजे काही नाही
सर्व काही खेळ झाला होता

कधी तू रुसलीस
तर मी हसवायचो
भूक लागली म्हणालीस
कि सरळ हॉटेलात न्यायचो

तू दमलीस म्हणाल्यावर
मी मुद्दामच बसायचो
तुझा नकळत तुझाकडे
एकटक पाहत रहायचो

हे अस सारख घडू लागल
सर्व कस आपोआपच बिघडू लागल
तुझ माझ भेटन कमी होत होत
तुझ अस वागण मलाही कळत नव्हत

नंतर तुझा मैत्रिणीने सांगितल
कि तुझा घरी कोणीतरी हे सांगितल
तुझा घरचांचा तुझावर धाक होता
पण तेवढाच 'प्रेम' या शब्दावर राग होता

खरच खूप प्रयत्न केले परत यायचे
पण खूप वेळ झाला होता
प्रेम म्हणजे काही नाही
सर्व काही खेळ होता
सर्व काही खेळ ..................

मला माफ कर मी तुला नाही मिळवू शकलो.................
Share on Google Plus

About Hanumant Nalwade