तुच म्हणायचीचं ना, प्रेम फक्त एकदाच होतं...

आज तु दुसर्या कुणासोबत करत आहेस, मग ते काय एवढं तरी सांग ?

तुच म्हणायचीचं ना, जगणार नाही माझ्याशिवाय...
मग आता जगतेस कसं, ते तरी सांग...

खोटी होती गं सगळीचं वचने तुझी, खोटेचं असेन तुझे प्रेम ही...


मी मात्र खरा होतो, खरे होते प्रेम माझे...

जेव्हा तुला कळेल माझ्या प्रेमाची किंमत, तेव्हा पुन्हा माझ्याकडे येऊ नकोस...
मी त्यावेळी ही फक्त तुझाचं असेन, फक्त तु पुन्हा माझी होऊ नकोस...

एकदा तुटलेली काच, जशी पुन्हा जोडता येत नाही...
तशीचं आहे गत प्रेमाची, एकदा ह्रदय तुटलं की
पुन्हा खरे प्रेम कधीचं होत नाही.... पुन्हा खरे प्रेम कधीचं होत नाही....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top