तुझ्याविणा एक क्षणही करमत नाही

तुला एकटक पाहीलं की,
मला काय होतं,
काहीच कळत नाही.....

तुझ्याशी बोललो की,
मी का अबोल होतो,
काहीच वळत नाही.....

तुझ्या मिठीत आलो की,
मी का स्वतःला विसरतो,काहीच उमजत नाही.....

तुझ्यात गुंतलो का,
मी का बेभान होतो,
काहीच समजत नाही.....

तुझ्याडोळ्यात बघितलं की,
मी का तुझ्यात हरवतो,काहीचउमजत नाही.....

तुझ्याजवळ असलो की,
फक्त तुलाच पहावसं वाटतं,काहीच दुसरं दिसत नाही.....

तु लाजलीस की,
फक्त तुझ्या ओठांच हसू बनतो,काहीच जमत नाही.....

मनापासून खरं सांगायच तर,पिल्लू,
जानू,
शोनू,
मला ना,
तुझ्याविणा एक क्षणही करमत नाही.
Share on Google Plus

About Govinda Nalwade