मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी
हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख
आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी मनातील वादळांना मनातच थोपवणारी
भासते कधी आकाशातील चांदणीसारखी तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी
तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर तरीही अंतःरात रुतलेली खोलवर
तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे हरलो जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे..