आयुष्यात प्रेम नावाचा भाग प्रत्येकाच्या वाट्याला एकदा तरी येतो आणि तो नक्कीच यावा कारण त्याशिवाय जगणं काय ते नाही उमगत…. आपण मनाने , शरीराने कितीही मोठे झालो तरी प्रत्येक्ष अनुभवलेलं च नेहमी आयुष्यात पुढे उपयोगात येतं… पुढच्या आयुष्याची पालं-मुळे आपल्या आताच्या जगण्यात च नकळत रुजत असतात….  पण एक जाणीव देऊन गेलीस कि खरं प्रेम हे एकदाच होत आणि पुन्हा कितीही आवं आणून करायचा प्रयत्न केला तरी तो फक्त एक भासच असू शकतो फक्त…

 पण आयुष्यभर तुझ्या विचारात गुंतण्याचा नाद लावून गेलीस… बस मनाची हि अवस्था म्हटली तर बिकट म्हटली तर नाही सुद्धा…. कदाचित पुढे जाऊन सर्व काही ठीक हि होईल , आयुष्य सावरेल पण तरी मन मात्र सावरल्याच फक्त सोंगच करत असेल , तेव्हा सुद्धा या सर्वात ते तुलाच शोधत असेल.…

गूगल ऐडवर्ड्स

 
Top