Sunday, September 8, 2013

आयुष्य माझे संपले आहे


कुणावर खरे प्रेम करताना, आयुष्य माझे संपले आहे.....

कुणासाठी तरी आयुष्य माझे, पुर्णपणे बरबाद होवून वाहीले आहे.....
खरे असुनही प्रेम ते माझे, माझेचं न राहीले आहे.....
जे काही मिळाले मला, ते मी हरवतांना पाहीले आहे.....
आयुष्यचं माझे एक न सुटणारे, वेदनामय कोडे बनून राहीले आहे.....
नशिबचं आहे फुटके माझे, ज्यात काहीचं न करण्यासारखे उरले आहे.....
लोक म्हणतात कि फूले, फूलताना नेहमी हसतात.....
पण मी फूलांना नेहमी एकटेपणात, ढसाढस रडतांना पाहीले आहे.....
कारण आयुष्यभर भांडूणही जे पुर्ण नाही होऊ शकले,
त्या मला दाखवलेल्या कधीचं न पुर्ण होणा-या खोट्या.....
स्वप्नांना मी दूर जातांना पाहीले आहे.....
Reactions: